आकाश उजळले होते!

शाळेत असताना सुरेश भटांची खालील कविता माझी favourite होती.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ||

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते ||

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरु या
(पाऊल कधी वार्याचे माघारी वळले होते?) ||

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी…
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते ||

याचेच रडू आले की, जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुंत मिसळले होते ||

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे ह्रदयाशी मी भास कवळले होते ||

घर माझे शोधाया मी वार्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते ||

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते ||
                                                         
                                                        सुरेश भट

ह्या कवितेवरील विडंबन काव्यही तितकेच interesting आहे.

हॉटेल उजळले होते!

इतकेच मला खाताना पानावर कळले होते
वरणाने केली सुटका (कच्च्या) भाताने छळले होते ||

ही दुनिया आचार्यांची बोलुनी बदलली नाही
मी मीठ इथे रागाने नुसतेच उधळले होते ||

खाल्लेल्या पक्वान्नाचा मधुवास गड्या विसरु या
(पाऊल कधी वाढप्याचे माघारी वळले होते?) ||

मी ऐकवली तेव्हाही मालकास हीच कहाणी
मग नावच त्याने माझे ‘लिस्टातून’ वगळले होते ||

याचेच रडू आले की, जमले न मला हसणेही
मी तिक्त तिक्त ते अन्न पोटात मिसळले होते ||

नुसतीच कधी मिसळेची पावाशी झणझण झाली
नुकतेच कुठे ओठाशी मी घास कवळले होते ||

स्थान माझे शोधाया मी कीचनभर वणवण केली
जे ताट मला दिसले ते आधीच विसळले होते ||

मी एकटाच त्या रात्री वेगाने जेवत होतो
मी उठलो तेव्हा सारे हॉटेल उजळले होते ||

                                                  हेमंत डांगे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s