ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय-एक मनःपटलावरील युद्ध २

पूर्व भाग

The Bridge on the river Kwai

The Bridge on the river Kwai

‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ हा चित्रपट म्हणजे युद्धकाळातील एका पुलाच्या निर्मितीची आणि त्याच्या नाट्यमय विनाशाची कथा. तसेच पुलाच्या बांध्णीच्य निमित्ताने जपानी कर्नल स्सयटो व ब्रिटिश कर्नल निकोल्सन यांच्यातील तात्त्विक संघर्षाची ही कथा! जीवनाकडे बघण्याच्या विविध दृष्टिकोनांच दर्शन घडवणारा हा चित्रपट!

सन १९४३! दुसर्‍या महायुद्धाचा काळ! घनदाट जंगलातील जपान्यांचा एक कॅम्प-कॅम्प नं. १६. तेथे रेल्वेच्या रूळाचे काम चालू आहे. ब्रिटिश युद्धकैद्यांची एक बटालियन तेथे कामासाठी आंअली जाते. कॅमेरा हळूहळू जथ्थ्यावरून फिरतो. कुणाचा हात तुटलेला… तर कुणाचा पाय, कुणाचे कपडे फाटके… तर तर कुणाच्या फासळ्या वर आलेल्या, पायातील बुटांचीही अशीच दशा! कँप जवळ येताच मात्र शिस्तबद्ध मार्चिंगला सुरूवात… पार्श्वभूमीला शिट्टीवरील मार्चिंगचे संगीत! जणू पराभूत झालेल्या तुकडीचं मनोबल वाढवण्याचं कामच ते करतं. शरीरयष्टीने लहान पण ताठ व्यक्तीमत्त्वाचा करारी निकोल्सन, कर्नल सायटोला आपली ओळख करून देतो. सायटोही आपली ओळख कँपप्रमुख म्हणून दिमाखात करून देतो. इकडे मार्चिंग तालात सुरूच! ‘विश्राम’ची सूचना मिळाल्यावरच सर्व थांबतात. काही जखमी सैनिक खाली कोसळतात. त्यांचे जोडीदार त्यांना सावरतात.

कर्नल सायटो सर्वांसमोर जोरदार भाषण ठोकतो, “बँकॉक ते रंगून या रेल्वेमार्गांचे काम चालू आहे, तुम्हां ब्रिटिश कैद्दांना येथे कामासाठी आणले आहे. काम चांगलं केलंत तर चाईगली वागणूक मिळेल अन्यथा शिक्षा! तुकडीतील सर्व अधिकर्‍यांनीही काम करायलाच हवं!” यावर निकोल्सन त्याला जिनिव्हा कराराची आठवण करून देतो. त्यातील एका कलमानुसार, अधिकार्‍यांना शरीरिक कष्टाचे काम देऊ नये, असे म्हटल्याचे सांगतो.

त्याचवेळी अमेरिकन कमांडर शिअर्स व लेफ्टनंट जिनिग्ज तात्पुरत्या रुग्णालयात बसून काय भानगड चाललीय याचा अंदाज बांधतात. दोघेही अंगानं धडधाकट असतात. पण इथे काम करुन काय फायदा?, असा विचार करून दोघेही रुग्णाचं सोंग घेऊन वावरतात.

सायटोच्या मते तो ठरवेल तो कायदा! त्याचवेळी तो धोक्याची सूचना देतो,’कुणीही पळायचा प्रयत्न करु नका. यथे घनदाट जंगलात तुम्ही आहात. एकतर आमचे सैनिक तुम्हाला पकडतील अन्यथा येथील निसर्गच! एक दिवस विश्रांती घ्या अन् उध्यापासून कामाला लागा.’

सर्वजण आपल्या बराकीत जातात. रात्री धो-धो पाऊस पडतो; पण निकोल्सनला त्याची पर्वा नाही. आपल्या पराभूत सैनिकांचं मनोधैर्य त्याला टिकवायचं आहे. त्यासाठी तेथील तात्पुरत्या रुग्णालयाला तो भेट देतो. तेथील इतर अधिकार्‍यांना जागविण्याचा प्रयत्न करतो. तेथे त्याला भेटतो अमेरिकन कमांडर शिअर्स! एका बोटीतून जाताना त्यांची बोट फुटते अन् हा वाचतो; पण येऊन पोहोचतो सायटोच्या युद्धकैद्यांच्या कँपवर! आजारी म्हणून सवलत घेऊन राहाणं त्याला जास्त पसंत! निकोल्सन त्याला आपल्या अधिकार्‍यांच्या चमूत सामील करून घेऊ पाहातो; पण त्याच्या डोक्यात पलायनाचे विचार पक्के! निकोल्सन आपल्या अधिकार्‍यांना बजावतो,”आपल्या सैनिकांच्या मनात आपण सैनिक आहोत्,’गुलाम’ नाही; ही भावना जागी राहायला हवी”.

पुढचा भाग

Advertisements

3 thoughts on “ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय-एक मनःपटलावरील युद्ध २

  1. Pingback: ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय-एक मनःपटलावरील युद्ध १ « Siddhesh’s Abhivyakty

  2. Pingback: ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय-एक मनःपटलावरील युद्ध ३ « Siddhesh’s Abhivyakty

  3. Pingback: ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय-एक मनःपटलावरील युद्ध ३ « Siddhesh’s Abhivyakty

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s